सरस्वती विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:13 IST2020-01-19T22:45:56+5:302020-01-20T00:13:58+5:30

सायने येथील सरस्वती विद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष दगेसिंग राजपूत होते. इंदिरा महिला बॅँकेच्या संस्थापक श्रीमती इंदिरा हिरे यांनी स्पर्धांचे उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून सतीश कलंत्री, आशा खरे, प्रा.एच. टी. अहिरे, अमित खरे, पौर्णिमा खरे उपस्थित होते.

Lecture competition at Saraswati School | सरस्वती विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

सायने येथील सरस्वती विद्यालयात झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळविणाऱ्या आरबीएच कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी सिद्धी खैरे, पद्मश्री पवार. समवेत प्राचार्या अलका जोंधळे, राजेंद्र पाटील, प्रमिला पाटील, कीर्ती पवार आदी.

मालेगाव : सायने येथील सरस्वती विद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष दगेसिंग राजपूत होते. इंदिरा महिला बॅँकेच्या संस्थापक श्रीमती इंदिरा हिरे यांनी स्पर्धांचे उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून सतीश कलंत्री, आशा खरे, प्रा.एच. टी. अहिरे, अमित खरे, पौर्णिमा खरे उपस्थित होते.
स्पर्धेत मोठ्या गटात आरबीएच कन्या विद्यालयाची नववीची विद्यार्थिनी सिद्धी विजय खैरे प्रथम, र.वी. शाह विद्यालयातील अनिश सुजीत पाटील द्वितीय, तर दसाणे येथील मातोश्री भा.वा. हिरे विद्यालयातील विद्यार्थिनी कावेरी मनोहर निकम हिने तृतीय क्रमांक पटकावला.
लहान गटात सातवीतील रु. झुं. काकाणी कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का रवींद्र पवार हिने प्रथम, सरस्वती माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी हिमांशु सुनील पवार याने द्वितीय, तर आरबीएच कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी पद्मश्री सतीश पवार हिने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना उद्योजक विजय पोफळे यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोफळे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचलन निंबा बोरसे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Lecture competition at Saraswati School