चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यान

By Admin | Updated: July 28, 2014 00:41 IST2014-07-27T23:25:17+5:302014-07-28T00:41:13+5:30

चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यान

Lecture at Chandwad Engineering College | चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यान

चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यान

 ंचांदवड : येथील एस. एन. जे. बी. संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागाच्या वतीने ‘लिटरेचर सर्व्हे’ या विषयावर नाशिक येथील एम.ई.टी. कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या संगणक विभागाचे प्रमुख व पुणे विद्यापीठाचे बी.ओ.एस. मेंबर डॉ. एम. यू. खरात यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या व्याख्यानात डॉ. खरात यांनी अंतिम वर्षातील संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट निवडीनंतर तंत्रज्ञानामध्ये आधी काय शोध झाले आहेत आणि त्यामध्ये काय त्रुटी आहेत. त्या शोधून त्याची सविस्तर मांडणी कशी करायची व त्यातून काय करता येईल याची माहिती दिली.
अध्यक्षस्थानी प्रा. एम. एम. राठोड होते. त्यांनी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी महाविद्यालय सदैव प्रयत्नशील राहील व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. संयोजन प्रा. ए. एल. मैंद यांनी केले, तर कार्यक्रमास संगणक विभागप्रमुख प्रा. एम. आर. संघवी, प्रा. पी. आर. भालदरे, विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Lecture at Chandwad Engineering College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.