सोड देवा मौन
By Admin | Updated: July 9, 2014 01:30 IST2014-07-09T01:29:59+5:302014-07-09T01:30:17+5:30
सोड देवा मौन

सोड देवा मौन
चंद्रभागेतीरी, भक्तीचा पूर
कसे एकाएकी, आटले आभाळ
देवा तुझ्या भेटी, आणिला निवृत्ती
तरी का दुष्काळ, रानोमाळ
भक्त जागोजागी, घालिती रिंगण
कोरडे अंगण, का करिशी आबाळ
ढग झाले आता, वाऱ्याला फितूर
बळीराजा आतूर, नको अशी वेळ
धोंडी धोंडी पाणी, मागती गोपाळ
तरी पिकला ना, साळमाळ
म्हणे भगवंत, भक्तीचा भुकेला
तू का रे निष्ठुर, सोसवेना कळ
तुटली रे आता, संयमाची माळ
नको अंत पाहू, उजळ भाळ
सोड देवा मौन, हरपले भान
थकले रे आता, मृदंग-टाळ
तुझ्या गजरात, दिंड्या रे हजर
कोठे लपला तू, वेळ पाळ
टळू नको देऊ, आषाढीची वारी
कर आबादानी, वाढव बळ
- संजय वाघ, नाशिक