शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिला दिनीच मुलीचे अर्भक टाकून पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 02:09 IST

जागतिक पातळीवर महिला दिन विविध उपक्रम व कार्यक्रमांनी साजरा करून महिलांचे गुणगान केले जात असताना शहरालगतच्या पांडवलेण्याच्या पायथ्याशी एका महिलेने आपले स्वत:चे स्त्री जातीचे अर्भक अक्षरश: सोडून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला आहे.

इंदिरानगर : जागतिक पातळीवर महिला दिन विविध उपक्रम व कार्यक्रमांनी साजरा करून महिलांचे गुणगान केले जात असताना शहरालगतच्या पांडवलेण्याच्या पायथ्याशी एका महिलेने आपले स्वत:चे स्त्री जातीचे अर्भक अक्षरश: सोडून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला आहे. पांडवलेणी सर करीत असताना एका वाटसरूला अर्भकाच्या रडण्याचा आवाज आल्याने तत्काळ त्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन अर्भक ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पांडवलेण्याच्या पायथ्याशी दुपारी २ वाजेच्या सुमारास लहान बालकाच्या रडण्याचा आवाज येथील व्यावसायिक सचिन घुगे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले तर याठिकाणी एका पांढऱ्या कपड्यात स्त्री जातीचे बाळ दिसले. त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना व व्यावसायिकांना बोलावून या बाळाच्या पालकांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. मात्र त्याठिकाणी बालक आमचे नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे आता या बालकाचे काय करायचे? असा विचार करून नागरिकांनी इंदिरानगर पोलिसांना माहिती दिली. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या अर्भकास ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले.कारवाईची मागणीपोलिसांनी घुगे यांच्या फिर्यादीवरून अर्भकाला बेवारस सोडून जाणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशीच एका मातेने आपले एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक अशा पद्धतीने सोडून जाणे म्हणजे अत्यंत निंदनीय प्रकार असल्याने पोलिसांनी या बालकांच्या पालकांचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी