आता शाळेत असतानाच शिका वाहतुकीचे नियम

By Admin | Updated: September 23, 2015 00:24 IST2015-09-23T00:24:34+5:302015-09-23T00:24:49+5:30

आता शाळेत असतानाच शिका वाहतुकीचे नियम

Learn the rules of transport while still in school | आता शाळेत असतानाच शिका वाहतुकीचे नियम

आता शाळेत असतानाच शिका वाहतुकीचे नियम

नाशिक : बेशिस्त वाहतुकीविषयी केवळ ओरड करून उपयोग नाही. वाहतुकीचे नियम पालनासाठी मुळातच संस्कार झाले पाहिजे, हेच लक्षात घेऊन नाशिक फर्स्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे धडे शिकवण्यासाठी महापालिकेच्या सौजन्याने चिल्ड्रेन्स पार्क साकारले असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. शनिवारी (दि. २६) त्याचे उद्घाटन होणार आहे.
वाहतूक नियमनावर काम करणाऱ्या नाशिक फर्स्ट या संस्थेने महापालिकेला चिल्ड्रेन पार्कचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार तुपसाखरे लॉन्सच्या पाठीमागील तीन एकर जागा पालिकेने दिली असून त्यावर अनेक कंपन्यांच्या आर्थिक मदतीवर हा प्रकल्प उभा राहिला आहे. या पार्कमध्ये रस्ते, दुभाजक, सिग्नल, वाहतूक बेट, पेट्रोल पंप, पिकअप शेड साकारण्यात आले असून प्रशिक्षणाला येणाऱ्या मुलांना सायकली उपलब्ध करून देऊन त्यांना याठिकाणी वाहतूक नियमाचे पालन करीत कसे जावे याची माहिती दिली जाईल. तत्पूर्वी एक तास अगोदर वाहतुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल. दोन तासांच्या या कालावधीत मुलांना वाहतुकीची चिन्हे व त्याचा वापर याबाबतही माहिती दिली जाणार आहे. सदरचे सर्व प्रशिक्षण मोफत सेवाभावी वृत्तीने दिले जाणार असल्याचे अभय कुलकर्णी यांनी सांगितले. शालेय मुलांबरोबरच शनिवारी आणि रविवारी ज्येष्ठ नागरिकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राने प्रकल्पासाठी अडीच कोटी रुपयांची मदत केली आहे. शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे उद्घाटन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Learn the rules of transport while still in school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.