नाशिक : जीवन जगण्याची युक्ती गुरू आणि संतांकडून मिळते. संत आणि सत्संग दुर्लभ असला तरी परमार्थाचा मार्गच साधकाला तिकडे नेऊ शकतो. समाजाच्या दुर्लक्षित वर्गासाठी उत्पन्नातून ठराविक भाग खर्च करून लोकांच्या हृदयातील परमेश्वर प्रसन्न करावा, असा उपदेश आनंदमूर्ती गुरू माँ यांनी प्रवचनात केला.नाशिकच्या ऋषी चैतन्य कथा समितीने आयोजित केलेल्या ज्ञान, योग आणि भक्तीची अमृतवर्षा सत्संग सोहळ्याच्या समारोपाचे प्रवचन आनंदमूर्ती गुरू माँ यांनी केले. त्यांनी आपल्या मधुर वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न करून देशाची जडणघडण करणारे शिक्षक आदरस्थानी आहेत. विविध श्रवणीय भजने, रामनाम, हरिनाम, विठ्ठलनामाचा जागर भाविकांनी अनुभवला. आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी उपमहापौर गुरु मित बग्गा आदींसह पदाधिकाऱ्यांनी सत्संग सोहळ्याला हजेरी लावली.आज सकाळी गंगापूर रस्त्यावरील शंकराचार्य कुर्तकोटी सभागृहात आनंदमूर्ती गुरू माँ यांनी शेकडो इच्छुक भाविकांना मंत्रदीक्षा दिली.
जीवन जगण्याची युक्ती गुरू, संतांकडून शिकावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:13 IST
जीवन जगण्याची युक्ती गुरू आणि संतांकडून मिळते. संत आणि सत्संग दुर्लभ असला तरी परमार्थाचा मार्गच साधकाला तिकडे नेऊ शकतो. समाजाच्या दुर्लक्षित वर्गासाठी उत्पन्नातून ठराविक भाग खर्च करून लोकांच्या हृदयातील परमेश्वर प्रसन्न करावा, असा उपदेश आनंदमूर्ती गुरू माँ यांनी प्रवचनात केला.
जीवन जगण्याची युक्ती गुरू, संतांकडून शिकावी
ठळक मुद्देआनंदमूर्ती गुरू माँ : सत्संग सोहळ्याचा समारोप