पालिकेच्या जलवाहिनीला गळती
By Admin | Updated: November 28, 2015 22:47 IST2015-11-28T22:47:03+5:302015-11-28T22:47:45+5:30
पालिकेच्या जलवाहिनीला गळती

पालिकेच्या जलवाहिनीला गळती
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील पार्कसाईडलगत जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने गंगापूर धरणात पाण्याचा साठा कमी आहे. त्यातच न्यायालयाच्या आदेशाने सुमारे वीस दिवसांपूर्वी धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे धरणातील पाण्याचा साठा कमी झाला आहे. कमी असलेल्या पाणीसाठ्यामुळे पुढील काही काळात तीव्र पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागणार
आहे.
सुमारे दहा दिवसांपासून वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील पार्कसाईडजवळ असलेल्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून सकाळी एक तास लाखो लिटर पाणी वाया जाऊन त्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. नागरिकांनी मनपाच्या नियोजन शून्य कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.