शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पाटावरील मुख्य जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:16 IST

गावातील सुला वाइनरोडवरील पाटावर महानगरपालिकेच्या भुयारी अंतर्गत (उजवा कालवा) जलवाहिनीला गेल्या दोन वर्षांपासून गळती लागली असून, पाण्याचे लोटच्या लोट वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गंगापूर : गावातील सुला वाइनरोडवरील पाटावर महानगरपालिकेच्या भुयारी अंतर्गत (उजवा कालवा) जलवाहिनीला गेल्या दोन वर्षांपासून गळती लागली असून, पाण्याचे लोटच्या लोट वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. येथील महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह लिक करून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होत आहे. मात्र महापालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे.परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रार करूनदेखील कुठल्याही प्रकारची दखल महापालिकेकडून घेण्यात आली नसल्याने दोन वर्षांत येथे महापालिकेचे लाखो लिटर पाणी वाया जाऊन काही प्रमाणात त्याची चोरीही गेल्याचे समजते.जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाईने हाहाकार माजलेला असताना गंगापूर गावातील या धरणातून आलेल्या थेट पाइपलाइनला मध्ये ब्रेक केल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. ज्याप्रमाणे महापालिका अनधिकृत नळजोडणी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करते, तशी दंडात्मक कारवाई आता महापालिकेच्या या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर करणार का? असा सवाल नागरिक करीत आहेत. पाणीटंचाईचे रौद्ररूप तालुका व जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष करून दिसून येते.शहरी भागासाठी आमदारांना पाण्यासाठी आंदोलनाने करून भांडावे लागत असताना पाण्याची व्यवस्था राखणाºया अधिकाºयांकडून मात्र त्याचे दुर्लक्ष होताना दिसते. काही ठिकाणी दहा दहा दिवस पाणी येत नाही, तर काही ठिकाणी महिन्यातून दोनदा पाणी मिळत असतानाही मात्र मनपाच्या अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या पाण्याच्या मुख्य वाहिनीला त्वरित दुरु स्त करून महापालिकेचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.अधिकाºयांशी संपर्क साधूनही दुर्लक्ष  काही राजकीय पुढारी पाणी मिळत नसल्याने जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन नियोजन करण्याची विनंती करीत आहेत. मात्र, पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे लाखोली, तर पाणी वाया गेल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. पाइपलाइनमध्ये अनेक ठिकाणी गळती होत आहे. नागरिकांनी माहिती दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत पाणीपुरवठा अधिकारी कार्यकारी अभियंता चव्हाणके यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता ते रजेवर असल्याचे समजले, त्यांनी त्यांच्या कनिष्ठ अधिकारी संदीप नलावडे यांचा दूरध्वनी क्रमांक देऊन दोन दिवसांत कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पाण्यामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून याठिकाणी वाहने घसरून पडत आहेत़गंगापूर गावातील उजव्या पाटावरील महापालिकेच्या थेट मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने गंगापूर धरणाचे लाखो लिटर पाणी वाया गेले, आतातरी महापालिकेने सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसत असताना येथे पाणी वाया जाणे योग्य नसून ही गळती महापालिकेने त्वरित थांबवून वाया जाणारे लाखो लिटर पाणी वाचवावे.- बाळासाहेब लांबे, अध्यक्ष,सोमेश्वर मंदिर संस्थान

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी