गंगापूर कॅनॉललगत ड्रेनेज लाईनला गळती
By Admin | Updated: September 21, 2016 00:28 IST2016-09-21T00:27:43+5:302016-09-21T00:28:17+5:30
गंगापूर कॅनॉललगत ड्रेनेज लाईनला गळती

गंगापूर कॅनॉललगत ड्रेनेज लाईनला गळती
नाशिक : सातपूर विभागातील गंगापूर कॅनॉललगत महापालिकेच्या ड्रेनेज लाईनला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणावर सांडपाणी बाहेर पडत असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार अमोल पाटील यांनी महापालिकेकडे केली आहे. गंगापूर कॅनॉललगत मनपाच्या ड्रेनेज लाईनमधून गेल्या काही दिवसांपासून गळती सुरू आहे. याशिवाय, चेंबर्सही फुटले असून त्यातून निघणाऱ्या दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत अमोल पाटील यांनी महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर ड्रेनेज विभागाचे अभियंता रामचंद्र गांगुर्डे व जगन जोपळे यांनी भेट देऊन पाहणी केली.