सोयगाव केंद्रावरील लसीकरणात महिला आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:49+5:302021-06-17T04:10:49+5:30

सोयगाव नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सोयगाव नागरी ...

Leading women in vaccination at Soygaon center | सोयगाव केंद्रावरील लसीकरणात महिला आघाडीवर

सोयगाव केंद्रावरील लसीकरणात महिला आघाडीवर

सोयगाव नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सोयगाव नागरी आरोग्य केंद्रावर एकूण ४ हजार ४३० कोरोनाबाधित आढळले, तर ७० रुग्ण दगावले. ४ हजार ३६० रुग्ण बरे करण्यात यश मिळाले आहे. लसीकरणाबाबत आतापर्यंत ४५ वयावरील ७ हजार ११९ लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यात ४ हजार ५१७ स्त्री व २ हजार ६०२ पुरुषांचा समावेश आहे. पहिल्या डोसची सुरुवात १६ जानेवारीपासून झाली. आतापर्यंत पहिला डोस ५ हजार ३५९, तर दुसरा डोस १ हजार ७६० लोकांना देण्यात आला आहे. डॉ. जयश्री पवार यांच्या कार्यकाळात ही मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आल्याचे डॉ. सपना ठाकरे यांनी सांगितले. एप्रिल २०२० ते मे २०२१ पर्यंत या केंद्रावर एकूण ४१ हजार ६४४ स्वॅब नमुने घेण्यात आले. त्यापैकी १० हजार ३२२ रुग्ण बाधित आढळून आले, तर ३० हजार १८७ निगेटिव्ह आले. पैकी १ हजार १३५ सॅम्पल तांत्रिकदृष्ट्या रिजेक्ट झाले. या संकलन केंद्रावर सरासरी २४.७८ % कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.

इन्फो

स्वॅबसाठी मोबाइल टीम

प्रायव्हेट लॅबमध्ये १० हजार ९१८ रुग्णांची चाचणी केली असता ५ हजार११७ रुग्ण बाधित आले, म्हणजे सरासरी ५०.५३% असल्याचे आढळून आले. काही कारणास्तव स्वॅब संकलन केंद्रावर येऊ शकत नाहीत व जे स्वॅब देण्यास नकार देतात अशा रुग्णांची एचआरसी, एलआरसीचे स्वॅब घेण्याकरिता ‘मोबाइल टीम’ स्थापन करण्यात आली आहे.

कोट....

शहरात ५ ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. सहारा हॉस्पिटल, गिरणा पूल, शिवाजी पुतळा, एकात्मता चौक, रावळगाव नाका येथेही आरएटी व आरटीपीसीआर टेस्ट दररोज सुरू आहेत. या चेकपोस्टवर दररोज जवळपास ५०० टेस्ट केल्या जातात.

जय मोहिते, लॅब को-ऑर्डिनेटर, सोयगाव

Web Title: Leading women in vaccination at Soygaon center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.