शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

जिल्ह्यात बागलाण लसीकरणात आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 9:54 PM

नाशिक : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यावरून राजकीय घमासान सुरू असतानाच जिल्ह्यात आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. लसींचा साठाही अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने लसीकरणाबाबत संभ्रमावस्था वाढली आहे. नोंदणी करुनही अनेक ठिकाणी लस मिळत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देसुरगाणा सर्वात मागे : हॉटस्पॉट तालुक्यांत लसीकरणाचा वेग कमी

नाशिक : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यावरून राजकीय घमासान सुरू असतानाच जिल्ह्यात आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. लसींचा साठाही अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने लसीकरणाबाबत संभ्रमावस्था वाढली आहे. नोंदणी करुनही अनेक ठिकाणी लस मिळत नसल्याचे चित्र आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग चिंताजनक बनला असतानाच लसीकरणाचाही वेग वाढविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण २२४ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. त्यातील १८७ केंद्रांवरच लसीकरण केले जात आहे. लसीकरणासाठी सरकारकडून नागरिकांना आवाहन केले जात असून, केंद्रांवर लसीकरणासाठी रांगाही लागत आहेत. विशेषत: लस टोचून घेण्यात ज्येष्ठ नागरिक आघाडीवर आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ७३ हजार ६७९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात बागलाण तालुक्यात सर्वाधिक २० हजार ६३३ नागरिकांनी लस घेतली आहे. त्याखालोखाल निफाड तालुक्यातील १९ हजार ७४० नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यातील नांदगाव, चांदवड, येवला, पेठ, कळवण, सुरगाणा, देवळा व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे.

या तालुक्यात लसीकरण केलेल्या नागरिकांची संख्या पाच आकडयांच्यावर अद्याप जाऊन पोहोचलेली नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा पर्याय असल्याने जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. परंतु, प्रत्येक तालुक्याला दिलेल्या उद्दिष्टानुसार लसीकरण होत नसल्याचे चित्र असून काही ठिकाणी लसीचा पुरेसा साठा नसल्याचे वास्तव आहे.मालेगावमध्ये १६,७४३ नागरिकांचे लसीकरणमागील वर्षी सुरूवातीला मालेगाव शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. नंतर मालेगाव शहर व तालुक्यातील कोरोना नियंत्रणात आला होता. आताही मालेगावमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. परंतु त्या तुलनेत लसीकरण होत नसल्याने चिंता वाढली आहे. शहरात अजूनही लोकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रमावस्था आहे. आजमितीला मालेगाव शहरात १६ हजार ७४३ नागरिकांचे लसीकरण झाले असून, गुरुवारी (दि. ८) ३६१० लस साठा उपलब्ध होता.तालुकानिहाय लसीकरण व शिल्लक साठातालुका लसीकरण शिल्लक साठानांदगाव ९३२९ ३५००मालेगाव १४९३२ ३५००इगतपुरी ११००० ५०००सिन्नर ११२१४ ००००चांदवड ९११० ३४९०येवला ७५२९ १७००पेठ ६२८६ २५९०कळवण ९९५२ २९६०सुरगाणा ४८८८ २१००बागलाण २०६६३दिंडोरी १२६१७ १८८३देवळा ८९३३ ३६६७निफाड १९७४० ५१६०

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय