जिल्ह्यात बागलाण लसीकरणात आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 09:54 PM2021-04-08T21:54:06+5:302021-04-09T00:31:57+5:30

नाशिक : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यावरून राजकीय घमासान सुरू असतानाच जिल्ह्यात आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. लसींचा साठाही अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने लसीकरणाबाबत संभ्रमावस्था वाढली आहे. नोंदणी करुनही अनेक ठिकाणी लस मिळत नसल्याचे चित्र आहे.

Leading in Baglan vaccination in the district | जिल्ह्यात बागलाण लसीकरणात आघाडीवर

जिल्ह्यात बागलाण लसीकरणात आघाडीवर

Next
ठळक मुद्देसुरगाणा सर्वात मागे : हॉटस्पॉट तालुक्यांत लसीकरणाचा वेग कमी

नाशिक : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यावरून राजकीय घमासान सुरू असतानाच जिल्ह्यात आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. लसींचा साठाही अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने लसीकरणाबाबत संभ्रमावस्था वाढली आहे. नोंदणी करुनही अनेक ठिकाणी लस मिळत नसल्याचे चित्र आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग चिंताजनक बनला असतानाच लसीकरणाचाही वेग वाढविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण २२४ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. त्यातील १८७ केंद्रांवरच लसीकरण केले जात आहे. लसीकरणासाठी सरकारकडून नागरिकांना आवाहन केले जात असून, केंद्रांवर लसीकरणासाठी रांगाही लागत आहेत. विशेषत: लस टोचून घेण्यात ज्येष्ठ नागरिक आघाडीवर आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ७३ हजार ६७९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात बागलाण तालुक्यात सर्वाधिक २० हजार ६३३ नागरिकांनी लस घेतली आहे. त्याखालोखाल निफाड तालुक्यातील १९ हजार ७४० नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यातील नांदगाव, चांदवड, येवला, पेठ, कळवण, सुरगाणा, देवळा व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे.

या तालुक्यात लसीकरण केलेल्या नागरिकांची संख्या पाच आकडयांच्यावर अद्याप जाऊन पोहोचलेली नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा पर्याय असल्याने जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. परंतु, प्रत्येक तालुक्याला दिलेल्या उद्दिष्टानुसार लसीकरण होत नसल्याचे चित्र असून काही ठिकाणी लसीचा पुरेसा साठा नसल्याचे वास्तव आहे.

मालेगावमध्ये १६,७४३ नागरिकांचे लसीकरण
मागील वर्षी सुरूवातीला मालेगाव शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. नंतर मालेगाव शहर व तालुक्यातील कोरोना नियंत्रणात आला होता. आताही मालेगावमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. परंतु त्या तुलनेत लसीकरण होत नसल्याने चिंता वाढली आहे. शहरात अजूनही लोकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रमावस्था आहे. आजमितीला मालेगाव शहरात १६ हजार ७४३ नागरिकांचे लसीकरण झाले असून, गुरुवारी (दि. ८) ३६१० लस साठा उपलब्ध होता.

तालुकानिहाय लसीकरण व शिल्लक साठा
तालुका लसीकरण शिल्लक साठा
नांदगाव ९३२९ ३५००
मालेगाव १४९३२ ३५००
इगतपुरी ११००० ५०००
सिन्नर ११२१४ ००००
चांदवड ९११० ३४९०
येवला ७५२९ १७००
पेठ ६२८६ २५९०
कळवण ९९५२ २९६०
सुरगाणा ४८८८ २१००
बागलाण २०६६३
दिंडोरी १२६१७ १८८३
देवळा ८९३३ ३६६७
निफाड १९७४० ५१६०

Web Title: Leading in Baglan vaccination in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.