दिंडोरीत पेट्रोलपंप लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या जाळ्यात
By Admin | Updated: November 19, 2015 00:01 IST2015-11-19T00:01:24+5:302015-11-19T00:01:26+5:30
दिंडोरीत पेट्रोलपंप लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या जाळ्यात

दिंडोरीत पेट्रोलपंप लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या जाळ्यात
दिंडोरी : नवरात्रोत्सवाच्या काळात परिसरातील विविध पेट्रोपंपावर जबरी लूट करणाऱ्या टोळीचा म्होरक्या विजय गणपत जाधव (३२) गोंदवणी रोड, श्रीरामपूर यास पोलिसांनी अटक केले आहे.
२२ आॅक्टोबर रोजी वणी सापुतारा रोडवर माळे शिवारात
ब्रम्हा पेट्रोल पंपाच्या ठिकाणी बोलेरा गाडीच्या साहाय्याने डिझेलची मागणी करीत पिस्तूलचा
धाक दाखवून ४५ हजार ५०० रुपये रोख व मोबाईल असा दरोडा टाकून ऐवज लुटण्यात आला होता.
१६ आॅक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास पेठ रस्त्यावर
नाळेगाव शिवारात राधाकृष्ण पेट्रोलपंपावर तेथील कामगारांना लाकडी दांड्याने मारहाण करून एक लाख ८५ हजार रुपये रोख तीन मोबाईल लूटून नेण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या दोन्ही गंभीर घटनावरून ग्रामिण पोलिस अधिक्षक संजय मोहिते यांनी या गुन्ह्यांचा
तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार अपर पोलीस अधिक्षक प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नवले, सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास ताडीकोंडलवार, पोलिस उपनिरीक्षक मच्छिद्र
रणमाळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल धुमसे, रविद्र शिलावट यांनी गुप्त माहितीच्या आधारे पेट्रोल पंपावर जबरी लूट करणाऱ्या टोळीचा म्होरक्या विजय याला अटक केली. (वार्ताहर)