एलबीटीप्रश्नी आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
By Admin | Updated: June 10, 2014 00:57 IST2014-06-10T00:49:14+5:302014-06-10T00:57:46+5:30
एलबीटीप्रश्नी आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

एलबीटीप्रश्नी आज मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
नाशिक : स्थानिक संस्था कर (एलबीटी) हटावच्या मागणीसाठी राज्यभरातील व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी उद्या (दि. १०) सह्याद्री अतिथीगृह येथे सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांसमवेत सर्व महापौर व पालिका आयुक्तांची बैठक होणार आहे.
राज्य शासनाने राज्यातील जकात रद्द करून एलबीटी लागू केल्याने या नव्या कर प्रणालीला व्यापाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. राज्यातील बहुतेक महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी एलबीटी न भरण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. सध्या राज्यातील महापालिका क्षेत्रांत पावसाळापूर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत; मात्र व्यापाऱ्यांकडून एलबीटीलाच विरोध होत असल्याने महापालिकेच्या तिजोरीवर त्याचा परिणाम होत असल्याने कामे रखडली आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी उद्या येथे मुख्यमंत्र्यांसमवेत राज्यातील सर्व महापौरांची बैठक आयोजित करण्यात आली असून, एलबीटीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)