शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

लासलगावी घरफोड्यांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:15 IST

गाव, पसिरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडींचे सत्र सुरूच आहे. रविवारी होळकरनगर येथील बॅँक अधिकारी भूषण काशीनाथ राणे यांच्या बंगल्यावर निशाना साधत चोरट्यांनी सोन्याचे दागिने, लॅपटॉप, टीव्ही संच यासह रोख ४६ हजार रुपये असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना रविवारी मध्यरात्री  घडली. या धाडसी चोरीमुळे लासलगाव परिसरातील रहिवासांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लासलगाव : गाव, पसिरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडींचे सत्र सुरूच आहे. रविवारी होळकरनगर येथील बॅँक अधिकारी भूषण काशीनाथ राणे यांच्या बंगल्यावर निशाना साधत चोरट्यांनी सोन्याचे दागिने, लॅपटॉप, टीव्ही संच यासह रोख ४६ हजार रुपये असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना रविवारी मध्यरात्री  घडली. या धाडसी चोरीमुळे लासलगाव परिसरातील रहिवासांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेआहे.  भूषण राणे यांच्या घरी झालेल्या चोरीत २९ ग्रॅम सोन्याचे लॉकेट व पेण्डल, १७ ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, २.५ ग्रॅमची कर्णफुले, चांदीची दागिने यासह रोख ४६ हजार रुपये, सतरा हजारांचा टीव्ही, ३४ हजार रुपयांचा लॅपटॉप आदी वस्तू चोरी गेल्याचे सांगण्यात आले.  काही दिवसांपूर्वी येथील गणेशनगर भागातील अजगर मकबूल शेख यांच्या घरी रात्री चोरी  झाली. यात टीव्ही, कॅमेरा, सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण नऊ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला  होता.  दि. २२ नोव्हेंबर रोजी गणेशनगरातील भानुदास जोशी यांच्या घरी चोरी झाली. मयूर भानुदास जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टीव्ही चोरीस गेला आहे. लासलगाव येथील कोटमगाव रस्त्यावर असलेल्या झुआरी कंपनीचे खत दुकानाचे शटर अनोळखी इसमांनी डुप्लिकेट पटावी वापरून शटर खोलून डॉवरमध्ये ठेवलेली ८ हजार ९७३ रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. परिसरात घरफोडीचे सत्र सुरू असून, चोरांना त्वरित अटक करावी अशी मागणी होत आहे.  गस्तीवर असलल्या पोलिसांनी लासलगाव स्थानिक दोन चोरांना गजाआड केले. त्याकडून टीव्ही व मोबाईल फोन जप्त करण्यात  आला. भूषण सुधाकर धोदमल व रजिवान ऊर्फ पापा आयुब बागवान, रा. पिंजारगल्ली या दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी गुन्हा  केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सॅमसंग कंपनीचा एलईडी व मोबाईल संच ताब्यात घेण्यात आला.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा