नाशिक : लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या कालावधीत चोरट्यांनी शहरातील पाच ठिकाणी हात सफाई करून तब्बल १६ लाख दहा हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ यापैकी गंगापूररोड परिसरातील एकाच घरातून १३ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली, तर इतर ठिकाणच्या चोऱ्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ गंगापूररोडवरील जेहान सर्कलजवळ एका घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी तब्बल साडेतेरा लाखांची रोकड चोरून नेली़ माला ठक्कर (रा़ ३०२/अ, रुषिराज) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ३० आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला़ घरातील लोखंडी कपाटात ठेवलेल्या बॅगेत ठेवलेली रोकड चोरून नेली़ त्यामध्ये ५०० रुपयांच्या २ हजार ३०० नोटा, २००० रुपयांच्या १०० नोटा होत्या़दुसरी घटना गंगापूररोडवरील तेजोप्रभा कॉलनीत घडली़ एकनाथ माळी (रा़ ८, भालचंद्र अपार्टमेंट) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसारआकडीच्या साह्याने दागिने लंपासदिंडोरी रोडवरील स्रेहनगरमधील घराच्या बेडरूमची खिडकी उघडून चोरट्यांनी आकडीच्या साह्याने ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले़ तानाजी पेखळे (रा़ स्वामी पार्क सोसायटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार७ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत चोरट्यांनी आकडीच्या साह्याने सोन्याची साखळी,सोन्याचे पॅण्डल असे ३ तोळे ९ ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले़
लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या कालावधीत नाशकात चोरट्यांची दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:36 IST