देवळा उपनगराध्यक्षपदी लक्ष्मीकांत अहेर
By Admin | Updated: November 5, 2016 01:24 IST2016-11-05T00:54:29+5:302016-11-05T01:24:06+5:30
देवळा उपनगराध्यक्षपदी लक्ष्मीकांत अहेर

देवळा उपनगराध्यक्षपदी लक्ष्मीकांत अहेर
देवळा : येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी लक्ष्मीकांत शांताराम अहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अशोक अहेर यांनी आवर्तन पद्धतीनुसार पदाचा राजीनामा
दिल्याने सदर पद रिक्त होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कैलास पवार यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आलेल्या विशेष बैठकीत लक्ष्मीकांत अहेर यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. निर्धारित वेळेत अहेर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. यावेळी नगराध्यक्ष धनश्री अहेर, मावळते उपनगराध्यक्ष अशोक आहेर, गटनेते जितेंद्र अहेर, नियोजन सभापती अतुल पवार, पाणीपुरवठा सभापती प्रदीप अहेर, महिला बालविकास सभापती शीला अहेर, नगरसेवक बाळासाहेब अहेर, किरण अलिटकर, केदा वाघ, वत्सला अहेर, सिंधूबाई अहेर, सुनंदा अहेर, बेबी नवरे, ललिता भामरे, मनीषा गुजरे, डॉ. ललित मेतकर डॉ. प्रशांत निकम आदि उपस्थित होते. लक्ष्मीकांत अहेर यांच्या निवडीचे स्वागतकरण्यात येत आहे. (वार्ताहर)