तीन घरफोड्यांमध्ये लाखाचा ऐवज लंपास

By Admin | Updated: November 18, 2015 23:58 IST2015-11-18T23:57:36+5:302015-11-18T23:58:16+5:30

तीन घरफोड्यांमध्ये लाखाचा ऐवज लंपास

Laxas of Lakhas in three houses | तीन घरफोड्यांमध्ये लाखाचा ऐवज लंपास

तीन घरफोड्यांमध्ये लाखाचा ऐवज लंपास

नाशिक : शहरातील पंचवटी व उपनगर परिसरातील घरफोड्यांमध्ये सुमारे एक लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे़
पहिली घरफोडीची घटना म्हसरूळ प्रभातनगरमधील चिंतामणी रेसिडेन्सीमध्ये सोमवारी (दि़ १६) रात्रीच्या सुमारास घडली़ नितीन वसंत बच्छाव यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले विविध कंपन्यांचे मोबाइल टॅब, मोबाइल, मेमरी कार्ड, हेडफोन, बॅटरी असा ५३ हजार ५०० रुपयांचा ऐवज त्यांनी चोरून नेला़ या प्रकरणी बच्छाव यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुसरी घटना नवीन आडगाव नाक्यावरील बडदे चाळीत सोमवारी (दि़ १६) रात्रीच्या सुमारास घडली़ संजय विठ्ठल बडदे यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी लोखंडी कपाटातील ३५ हजार रुपये किमतीच्या दीड गॅ्रम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या व चांदीचा वाळा चोरून नेला़ याप्रकरणी बडदे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तिसरी घटना नाशिकरोडमधील अभिनव शाळेमागील स्नेहवर्षा अपार्टमेंटमध्ये घडली़ संतोष वसंत शिरसाठ हे १४ ते १७ या कालावधीत बाहेरगावी गेले होते़ या दरम्यान त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी लोखंडी कपाटातील २७ हजारांची रोकड चोरून नेली़ याप्रकरणी सिरसाठ यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Laxas of Lakhas in three houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.