सटाण्यात वकील संघाचा मोर्चा
By Admin | Updated: August 25, 2015 00:09 IST2015-08-25T00:09:29+5:302015-08-25T00:09:49+5:30
बायपासची मागणी : विविध पक्ष-संघटनांचाही पाठिंबा

सटाण्यात वकील संघाचा मोर्चा
सटाणा : शहराच्या प्रलंबित बायपासप्रश्नी आता सटाणा वकील संघही सरसावला आहे. जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वकील संघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सोमवारी (दि.२४) दुपारी वकील संघाने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. आंदोलनाचे नेतृत्व संघाचे अध्यक्ष अॅड. पंडितराव भदाणे यांनी केले.
सोमवारी दुपारी शहरातील यशवंतराव महाराज मंदिरापासून वकील संघाने आपल्या बायपासच्या मागणीसाठी धडक मोर्चास सुरुवात केली. हा मोर्चा टिळकरोडने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ताहाराबादरोड या प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर नेण्यात आला. दरम्यान मोर्चेकऱ्यांनी बायपास झालाच पाहिजे, कोण म्हणत होणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही, अशा विविध घोषणा दिल्या. मोर्चात विविध पक्षाच्या व सामाजिक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामील होऊन पाठिंबा दिला. यावेळी मोर्चाचे रुपांतर सभेत होऊन संघाचे उपाध्यक्ष अॅड. नितीन चंद्रात्रे, अॅड.एम. सी. सावंत, अॅड. रेखा शिंदे, तर डॉक्टर संघटनेचे डॉ. किरण अहिरे, कापड व्यापारी संघटनेचे दिलीप चव्हाण, वंदना भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांना वकील संघाच्या वतीने अध्यक्ष अॅड. पंडितराव भदाणे यांनी मागणीचे निवेदन सादर केल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला. मोर्चात अॅड. वसंतराव सोनवणे, अॅड. सतीश चिंधडे, ए. एल. पाटील, यशवंत पाटील, विश्वास सोनवणे, मनीषा पवार, स्मिता चिंधडे, शोनकुमार देवरे, अशोक पाटील, सोमदत्त मुंजवाडकर, रवींद्र पाटील, सरोज चंद्रात्रे, नीलेश डांगरे, प्रकाश गोसावी, विष्णू सोनवणे, किरण देवरे आदि वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांसह मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, प्रशांत कोठावदे, डॉ. जयवंत महाले, डॉ. सारिका महाले, डॉ. कुलदीप जाधव, डॉ. प्रशांत निकम, डॉ. स्वप्नील पवार, डॉ.नंदू पवार, डॉ. व्ही. के येवलकर, डॉ. मनोज शिंदे, डॉ. सिद्धार्थ जगताप, पंकज ततार, नंदू सोनवणे, पंकज सोनवणे, नितीन सोनवणे, पंडितराव अहिरे, वंदना सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, शरद ततार, गौरव शिंदे, नंदू पगार, बाळासाहेब निकम आदि
संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)