वकीलवाडीतील डॉक्टरवर छापा

By Admin | Updated: March 28, 2016 00:04 IST2016-03-27T23:56:54+5:302016-03-28T00:04:04+5:30

वकीलवाडीतील डॉक्टरवर छापा

A lawyer in the lawyer's office | वकीलवाडीतील डॉक्टरवर छापा

वकीलवाडीतील डॉक्टरवर छापा

नाशिक : औषधाची अवाजवी किंमत वसुली तसेच औषधाच्या गुणवत्तेबाबत ग्राहकाने केलेल्या तक्रारीवरून नाशिक महापालिकेचे अधिकारी व सरकारवाडा पोलीस यांनी रविवारी (दि़२७) दुपारी वकीलवाडीतील एका लैंगिक समस्या व वंध्यत्व क्लिनिकवर संयुक्तरीत्या छापा टाकला़
या प्रकरणी औषधाचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता़ सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वकीलवाडी परिसरातील एका लैंगिक समस्या व वंध्यत्व क्लिनिकमधील डॉक्टर औषधांची अवाजवी किंमत वसूल करीत असल्याची तसेच या औषधांच्या गुणवत्तेबाबत नाशिक महापालिकेकडे एका ग्राहकाने तक्रार केली होती़ या तक्रारीनुसार नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सरकारवाडा पोलिसांची मदत घेत छापा टाकला़ या अधिकाऱ्यांनी या डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी केली तसेच या ठिकाणी असलेल्या औषधांची तपासणी करून त्यातील काही नमुने गोळा केले़ हे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार असून, तेथील अहवालानंतर संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: A lawyer in the lawyer's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.