विधी संघर्षित बालकाची दुचाकीवरून पोलीस वाहनाला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:16 IST2021-09-22T04:16:56+5:302021-09-22T04:16:56+5:30

नाशिक : काठे गल्ली परिसरात एका विधी संघर्षित बालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोपेड दुचाकी वाहन चालकावर चक्क ...

Law-abiding child hits police vehicle on two-wheeler | विधी संघर्षित बालकाची दुचाकीवरून पोलीस वाहनाला धडक

विधी संघर्षित बालकाची दुचाकीवरून पोलीस वाहनाला धडक

नाशिक : काठे गल्ली परिसरात एका विधी संघर्षित बालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोपेड दुचाकी वाहन चालकावर चक्क पोलिसांच्या वाहनाला धडक दिल्याचा प्रकार रविवारी (दि. १९) घडला असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निसार शेख यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संबंधित विधी संघर्षित बालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विधी संघर्षित बालकाने एमएच १५ एचएल ०७७४ या मोपेड दुचाकीवर काठे गल्ली सिग्नलकडून नागजी सिग्नलकडे जाताना दुचाकी भरधाव वेगाने चालवून फरशीच्या गोडावून समोर उभ्या असलेल्या पोलिसांच्या गस्ती वाहनाला (एमएच १५ एबी०१६२ ) उजव्या बाजून समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून विधी संघर्षित बालकालाही दुखापत झाली आहे. त्यामुळे पोलीस सहायक पोलीस उपनिरीक्षक निसार शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Law-abiding child hits police vehicle on two-wheeler