कातरवाडी येथे तलाव खोलीकरणाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:59 IST2018-04-01T23:59:02+5:302018-04-01T23:59:02+5:30
चांदवड : तालुक्यातील कातरवाडी येथे ग्रामस्थांच्या सहभागातून तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.

कातरवाडी येथे तलाव खोलीकरणाचा शुभारंभ
चांदवड : तालुक्यातील कातरवाडी येथे ग्रामस्थांच्या सहभागातून तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी चांदवड पंचायत समिती सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, बालविकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे, कातरवाडीच्या सरपंच गीता झाल्टे, पाणी फाउंडेशनचे कातरवाडी अध्यक्ष रामदास संसारे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्राथमिक शाळेसाठी कंपाउंड, जुने गावठाण ते रामगुळणी रस्त्याची दुरुस्ती व दलित वस्ती शौचालय या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी गावचे सुपुत्र इंजिनिअर रावसाहेब झाल्टे यांनी पोकलँड मशीन उपलब्ध करून दिल्याने या कामांना मदत होणार आहे.