महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यशाळेचा शुभारंभ
By Admin | Updated: July 28, 2014 23:30 IST2014-07-28T22:45:20+5:302014-07-28T23:30:07+5:30
महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यशाळेचा शुभारंभ

महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यशाळेचा शुभारंभ
५सटाणा : श्री शक्ती मंच दिल्ली यांच्या वतीने महिलांच्या सशक्तीकरणासाठी येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज सभागृहात महाविद्यालयीन युवतींसाठी कार्यशाळेचा शुभारंभ देवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या हस्ते करण्यात आला़
श्री शक्ती मंच दिल्ली येथील सुधांशुजी महाराज यांच्या असीम अनुकृपेने या मंडळाने ठिकठिकाणी महिलांच्या सशक्तीकरणासाठी महाविद्यालयीन युवतींना शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिकदृष्ट्या सबल बनविण्यासाठी प्रा़सीमा सोनवणे भांडारकर यांनी मार्गदर्शन केले़ टाइम, मॅनेजमेंट, कार्यत्परता, स्वसंरक्षण, आत्मिक विकास याबद्दल मार्गदर्शन करीत योगासने, प्राणायाम व ध्यान या क्रियांचेदेखील भांडारकर यांनी प्रात्याक्षिक करून दाखविले़
कार्यशाळेसाठी देवस्थानचे उपाध्यक्ष दादाजी सोनवणे, प्रा़ शं़ क़ कापडणीस, बा़ जी़ पवार,
सुभाष बिरारी, बाबुलाल मोरे,
प्रा़ बी. डी़ बोरसे उपस्थित
होते़ (वार्ताहर)
मनसेच्या सिन्नर शहर उपाध्यक्षपदी पन्हाळे
सिन्नर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर उपाध्यक्षपदी अक्षय सुधीर पन्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली.
मनसेचे तालुकाध्यक्ष जयंत आव्हाड यांनी पन्हाळे यांना नियुक्तीपत्र दिले. पक्ष संघटना वाढीसाठी अधिक जबाबदारीने व जोमाने काम करणार असल्याचा विश्वास पन्हाळे यांनी यावेळी व्यक्त केला. (वार्ताहर)