पेठ तालुक्यात जलयुक्त शिवार चित्ररथाचा शुभारंभ
By Admin | Updated: May 3, 2016 23:02 IST2016-05-03T22:57:09+5:302016-05-03T23:02:02+5:30
पेठ तालुक्यात जलयुक्त शिवार चित्ररथाचा शुभारंभ

पेठ तालुक्यात जलयुक्त शिवार चित्ररथाचा शुभारंभ
पेठ : शासनाच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच या योजनेत जास्तीत जास्त जनतेचा सहभाग वाढवावा यासाठी १ मे महाराष्ट्र दिनापासून पेठ तालुक्यात फिरत्या चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला.
तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने कापूरझिरा येथे आयोजित कार्यक्रमात उपसभापती मंदा चौधरी यांच्या हस्ते चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपसभापती मंदा चौधरी, तहसीलदार कैलास कडलग, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्यामराव गावित, गटविकास अधिकारी बी.बी. बहिरम, तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार, नगरसेवक भागवत पाटील, रामदास भोये, सुशीला अलबाड यांच्यासह मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
प्रतिक्रि या
पेठ तालुका संपूर्ण टचाईग्रस्त घोषित करण्यात आला असून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सुरु करण्यात आलेला चित्ररथ गावागावात जाऊन जनजागृती करणार असून यामुळे शेतकरी व नागरिकांना योग्य दिशा मिळणार आहे. शेतकर्यांनी या अभियानात सहभाग घेऊन दुष्काळावर मात करावी.
-शिलानाथ पवार, तालुका कृषी अधिकारी