देवळा तालुक्यात शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 00:49 IST2021-07-22T22:41:26+5:302021-07-23T00:49:19+5:30

देवळा : शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून नाशिक जिल्ह्यात जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.

Launch of Shiv Sampark Abhiyan in Deola taluka | देवळा तालुक्यात शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ

उमराणा येथे शिव संपर्क अभियान प्रसंगी ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, तालुकाप्रमुख सुनिल पवार, देवळा शहर प्रमुख मनोज आहेर आदींसह शिवसैनिक.

ठळक मुद्दे देवळा, खर्डा, भऊर, लोहोनेर ऊमराणे आदी गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले.

देवळा : शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून नाशिक जिल्ह्यात जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.

सदर अभियान १२ ते २४ जुलै दरम्यान राबविले जात आहे. देवळा तालुक्यात ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. २१ रोजी वाखारी येथे बैठक घेऊन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर देवळा, खर्डा, भऊर, लोहोनेर ऊमराणे आदी गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले.
पाटील यांनी अभियानाची माहीती दिली, व हे अभियान राबविण्याचा उद्देश स्पष्ट केला. संपुर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबवुन तळागाळातील जनतेपर्यंत पोहचणे व त्यांच्या समस्या सोडवून सरकारच्या योजना नागरींकापर्यंत पोहोचवणे, त्याचबरोबर पक्षसंघटन मजबुत करणे हा उद्देश साध्य झाला पाहीजे असे जिल्हाप्रमुखांनी मनोगत व्यक्त केले. बुथप्रमुख व शाखाप्रमुख यांनी घराघरात जावुन शिवसेनेची ध्येयधोरणे व गोरगरीब जनतेची कामे करून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. शिवसंपर्क अभियानात तालुकाप्रमुख सुनिल पवार, उपजिल्हाप्रमुख देवानंद वाघ, देवळा शहर प्रमुख मनोज आहेर, विश्वनाथ गुंजाळ, तालुका संघटक बापु जाधव, भरत देवरे, वसंत सुर्यवंशी, भास्कर आहिरे, देवा चव्हाण, दहिवडचे सरपंच आदीनाथ ठाकूर, बंडू चव्हाण आदी सहभागी झाले होते.
 

Web Title: Launch of Shiv Sampark Abhiyan in Deola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.