पेठला महिला बचत गटांच्या विक्री स्टॉलचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:11 IST2021-06-03T04:11:16+5:302021-06-03T04:11:16+5:30

पेठ पंचायत समिती आवारात जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सभापती विलास ...

Launch of sales stall of Pethla Mahila Bachat Group | पेठला महिला बचत गटांच्या विक्री स्टॉलचा शुभारंभ

पेठला महिला बचत गटांच्या विक्री स्टॉलचा शुभारंभ

पेठ पंचायत समिती आवारात जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सभापती विलास अलबाड , भगवान पाडवी, मनोहर चौधरी, तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कावले, प्रभाग समन्वयक छगन नाठे, तालुका व्यवस्थापक राहूल जाधव, संतोषी माता स्वयंसहायता महिला बचत गटाच्या दुर्गा दरोडे, तसेच सावर्णा व कुंभाळे येथील महिला बचत गट प्रतिनिधी उपस्थित होते. या शॉपमध्ये तांदूळ, नागली, उडीद डाळ, खुरसनी, कुळीथ, आयुर्वेदिक मोहाचे तेल, निर्गुडी तेल, गांडूळ खत इत्यादी वस्तू कोरोनाचे नियम पाळून विक्रीसाठी ठेवल्या असल्याची माहिती व्यवस्थापक अमोल कावले यांनी दिली.

----------------------

पेठ पंचायत समिती आवारात बचत गटांच्या स्टॉलचे उद्घाटन करताना जि.प. सदस्य भास्कर गावित, विलास अलबाड, मनोहर चौधरी, अमोल कावले आदी. (०२ पेठ २)

===Photopath===

020621\02nsk_20_02062021_13.jpg

===Caption===

०२ पेठ २

Web Title: Launch of sales stall of Pethla Mahila Bachat Group