शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दहाव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथान स्पर्धेचा धावन मार्गमापनाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 13:59 IST

नाशिक : रविवार दि ७ जानेवारी २०१८ रोजी होणाऱ्या पाचव्या राष्ट्रीय व दहाव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथान स्पर्धेचा धावन मार्गमापनाचा शुभारंभ नाशिकचे जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक व सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. मविप्र संस्थेच्या वतीने डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रेरणेने मविप्र मॅरेथान स्पर्धा ९ वर्षापुर्वी सुरु झाली . ...

ठळक मुद्दे०९ वर्षापासून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन ७ जानेवारी रोजी स्पर्धा मविप्र मॅरेथान चौक येथून स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय व नामवंत खेळाडु प्रमुख पाहुणे मॅरेथान स्पर्धेच्या नोंदणीसाठी अ‍ॅप तयार

नाशिक : रविवार दि ७ जानेवारी २०१८ रोजी होणाऱ्या पाचव्या राष्ट्रीय व दहाव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथान स्पर्धेचा धावन मार्गमापनाचा शुभारंभ नाशिकचे जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक व सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. मविप्र संस्थेच्या वतीने डॉ. वसंतराव पवार यांच्या प्रेरणेने मविप्र मॅरेथान स्पर्धा ९ वर्षापुर्वी सुरु झाली . ७ जानेवारी रोजी स्पर्धा मविप्र मॅरेथान चौक येथून सुरु होऊन धोंडेगावपर्यंत व परत मॅरेथान चौक असा स्पर्धेचा मार्ग असणार आहे .जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना २०१८ हे वर्ष केंद्रीय क्रीडा मंत्री हर्षवर्धन राठोड यांनी क्रीडा वर्ष म्हणुन घोषित केले असुन मविप्र मॅरेथान स्पर्धेने नाशिकच्या २०१८ क्रीडा उपक्रमांची ची दमदार सुरुवात होणार असुन शासनाच्या वतीने मविप्र मॅरेथान स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगुन नशिक मविप्र मॅरेथान स्पर्धा देशात नाशिक शहराची एक वेगळी ओळख निर्माण करीत आहे ,संस्था गेल्या ०९ वर्षापासून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करीत असून जास्तीत जास्त नाशिककरांनी मॅरेथान स्पर्धेत सहभागी व्हावे असे, आवाहन रविंद्र नाईक यांनी केले .

मविप्र मॅरेथान धावनमार्ग हा भारतातील धावपटूसाठी आरोग्यदायी व सुखकर असून गेल्या ९ वर्षातील स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय व नामवंत खेळाडु प्रमुख पाहुणे म्हणून लाभले असुन त्यामध्ये धनराज पिल्ले , काका पवार , पी टी उषा , कविता राऊत , सुशिलकुमार यादव , व्ही व्ही एस लक्ष्मण , गगन नारंग , नरसिंग यादव,अंजू बॉबी जॉर्ज यासारख्या मान्यवरांचा समावेश आहे .दहाव्या राज्यस्तरीय मॅरेथान स्पर्धेच्या नोंदणीसाठी अ‍ॅप तयार करण्यात आले असुन अ‍ॅपचे उद्घाटन यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊनरजिस्ट्रेशन करता येईल  नाशिक जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी १८ वर्षाआतील मुले व मुली यांचेसाठी ६ की मी अंतराची स्पर्धा घेण्यात येणार आहे,तसेच ३५ वर्षापुढील महीलांची, ४५ , ६० आणि ७५ वर्षावरील पुरुष गटाच्या वेगवेगळ्या अंतराच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाNashikनाशिकeducationशैक्षणिक