शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘माझे कुटुंब’ मोहिमेचा नाशकात शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 01:39 IST

शहरात कोरोनाची संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत असले तरी नागरीकांनी स्वयंशिस्त बाळगणे आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून नागरीकांनी सजग राहून स्वत:ची आणि कुटुंबांची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर सतिश कुलकर्णी यांनी केले.

नाशिक : शहरात कोरोनाची संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत असले तरी नागरीकांनी स्वयंशिस्त बाळगणे आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून नागरीकांनी सजग राहून स्वत:ची आणि कुटुंबांची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर सतिश कुलकर्णी यांनी केले.राज्य शासनाने सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी च्या माध्यमातून कोविड मुक्त योजनेच्या शुभारंभाचा मुख्य कार्यक्र म नाशिक पूर्व विभागाच्या कार्यालयात मंगळवारी (दि.२२) झाला. यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त कैलास जाधव, सभागृह नेते सतीश सोनवणे,माझे कुटुंब माझी जबाबदारी चे सनियंत्रण अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या मोहिमेचा शुभारंभ प्रातिनिधिक स्वरूपात पथकांना थर्मल गनसारख्या वस्तूंचे किट देऊन करण्यात आला.यावेळी नगरसेवक अ‍ॅड. शाम बडोले, सुषमा पगारे, उपआयुक्त करु णा डहाळे, डॉ. प्रशांत शेटे, विभागीय अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. मुख्य सोहळ्यंनतर नाशिक महानगरपालिकेच्या इतर पाच विभागांमध्येही या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.राज्यासह शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने कुटुंब हा केंद्र बिंदू मानून त्याचे कोरोनापासून रक्षण व्हावे या हेतूने राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी विविध मोहिमांना प्रारंभ केला आहे.नागरिकांनी खबरदारीघेणे गरजेचेकोरोनावर मात करण्यासाठी जोपर्यंत लस किंवा औषध बाजारामध्ये येत नाही, तो पर्यंत नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे, असे आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी सांगितले. प्रशासन सर्व स्तरावर काम करत असून नागरिकांनी देखील प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले पाहिजे जेणे करून कोरोनासारख्या संकटातून सर्वांना बाहेर पडता येईल, असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या