दूरकळवाडीत आठवडे बाजाराचा शुभारंभ

By Admin | Updated: December 2, 2015 23:13 IST2015-12-02T23:10:42+5:302015-12-02T23:13:03+5:30

सोय : गिरणा खोऱ्यातील ग्रामस्थांची गैरसोय झाली

Launch of Market Week in Telokwadi | दूरकळवाडीत आठवडे बाजाराचा शुभारंभ

दूरकळवाडीत आठवडे बाजाराचा शुभारंभ

 कळवाडी : मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथे अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या आठवडे बाजाराचा अखेर शुभारंभ झाला. यामुळे कळवाडीसह परिसरातील गावांची आठवड्यातील बाजाराची मोठी सोय झाल्याने ग्रामस्थात समाधान व्यक्त होत आहे. कळवाडीच्या सरपंच पुष्पा मरसाळे यांच्या हस्ते वानरदेवाची पूजा करून आठवडे बाजाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच पुष्पा मरसाळे यांनी ग्रामस्थांबरोबर भाजीपाला खरेदीचा आनंद लुटला. गिरणा खोऱ्यातील मोठ्या लोकसंख्येने गाव म्हणून कळवाडी प्रसिद्ध असून, व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये, बॅँका, शेतकरी संघ, जलसंपदा विभागाचे कार्यालय, पोलीस औटपोस्ट, दूध डेअरीकरिता प्रसिद्ध आहे. बाजारासाठी काही लोकांना मालेगाव आणि चाळीसगाव येथे जावे लागत होते. यासाठी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव करण्यात आला होता. परिसरातील शेतकरी व शेतमजुरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच पुष्पा मरसाळे यांनी केले. परिसरातील शेतमजुरांना आठवडे बाजारासाठी दर सोमवारी सुटी मिळावी, अशी मागणी भाजपाचे संदीप देसले यांनी केली आहे. (वार्ताहर)
 

Web Title: Launch of Market Week in Telokwadi