शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मालेगाव औद्योगिक वसाहतीचा उद्या शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:37 AM

नाशिक : कायम चर्चेत राहिलेल्या मालेगाव येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीला मुहूर्त लागला असून, मालेगाव तालुक्याच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगारदेखील उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सायने आणि तिसºया टप्प्यातील अजंग औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ शुक्रवारी (दि. १४) रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे मुहूर्त लागला : निमा बैठकीत दादा भुसे यांची माहिती

नाशिक : कायम चर्चेत राहिलेल्या मालेगाव येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीला मुहूर्त लागला असून, मालेगाव तालुक्याच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगारदेखील उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सायने आणि तिसºया टप्प्यातील अजंग औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ शुक्रवारी (दि. १४) रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.मालेगाव तालुक्यातील बहुचर्चित सायने आणि अजंग रावळगाव औद्योगिक वसाहतीसाठी चालना मिळाली आहे. दुसºया टप्प्यातील सायने येथील २८३ एकर आणि अजंग रावळगाव येथील ८६३ एकर जागा औद्योगिक वसाहतीसाठी मंजूर झाली आहे. याबाबत निमात झालेल्या बैठकीत माहिती देताना ग्रामविकासमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, शेती महामंडळाच्या पाच हजार एकर पैकी ८६३ एकर जमीन ३८ कोटी रुपयात औद्योगिक वसाहतीला मिळाली आहे. ५०० चौरस मीटर पासून ४५ एकर पर्यंतचे भूखंड तयार करण्यात आलेले आहेत.मूलभूत सेवा सुविधांसाठी शासनाने ३५ कोटी रु पयांचा निधी मंजूर केला आहे.जलद गतीने नियोजन करु न काम प्रगती पथावर असल्याचे त्यांनी सांगितले. चणकापुर आणि पुनद धरणातून पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच गिरणा धरणातून शाश्वत पाणी पुरवठा केला जाणार आहे. या औद्योगिक वसाहतीला शासनाने डी प्लस झोनचा दर्जा दिला आहे. सुरु वातीला शासनाने दीड हजार रु पये दर ठेवला होता.परंतु पाठपुरावा करु न आता फक्त ८०० रूपये दर ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी पॉवरलुम,प्लास्टिक रिसायकल युनिट, प्लॅस्टिक रियुज युनिट असून यासह इंजिनिअरिंग उद्योग यावेत अशी अपेक्षा आहे. उद्योगांसाठी काही पॅकेज मिळावे यासाठी शासनदरबारी प्रयत्न सुरु आहेत. शुक्र वार दि.१४ रोजी दुपारी २ वाजता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते व खासदार सुभाष भामरे,आमदार असिफ शेख, महापौर रशीद शेख, एमआयडीसीचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पी.अनबलगन यांच्या प्रमुख उपस्थितीत पायाभूत विकास कामांचा आणि भूखंड वाटप कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती भुसे यांनी दिली.यावेळी व्यासपीठावर निमाचे उपाध्यक्ष शशीकांत जाधव,सरचिटणीस तुषार चव्हाण,महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा,लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन, उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार,कैलास आहेर, सुधाकर देशमुख,मंगेश पाटणकर,धनंजय बेळे,रावसाहेब रकीबे,मिलिंद राजपूत,बाळासाहेब गुंजाळ,योगिता आहेर,मनीष रावळ,प्रवीण आहेर,रमेश मालू आदींसह विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी,उद्योजक उपस्थित होते.अर्थकारणात होणार बदलदुसºया टप्प्यातील सायने आणि तिसºया टप्प्यातील अजंग रावळगाव या नवीन औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योग उभे राहतील. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील. हाताला काम मिळेल. मालेगाव तालुक्याच्या अर्थकारणात मोठे बदल होतील आणि मालेगावची जुनी ओळख मिटण्यास मदत होणार आहे.