शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
6
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
7
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
8
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
9
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
10
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
11
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
12
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
13
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
14
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
15
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
16
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
17
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
18
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
19
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
20
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आयुष्यमान योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 01:39 IST

केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ कार्यक्रमांतर्गत देशभरात सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ आदिवासी भागातील जनतेला मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

नाशिक : केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ कार्यक्रमांतर्गत देशभरात सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ आदिवासी भागातील जनतेला मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील लाभार्थी कुटुंबीयांना महाजन यांच्या हस्ते कार्डाचे वाटपही करण्यात आले.  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. महाजन पुढे म्हणाले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना खºया अर्थाने देशाच्या सशक्तीकरणाची योजना आहे. ही आतापर्यंतची जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असून विम्याची रक्कम केंद्र व राज्य शासन भरणार आहे. जिल्ह्णातील ४ लाख ८८ हजार ९ लाभार्थी कुटुंबांना योजनेचा लाभ होणार आहे. राज्य शासन सामान्य जनतेच्या चांगल्या आरोग्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून गरजूंना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब व्यक्तींना उपचारासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करण्यात आले आहे.  या योजनेच्या माध्यमातून देशातील ५० कोटी जनतेला ५ लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत करणे शक्य होणार आहे. योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना देण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.  यावेळी महाजन यांच्या हस्ते रवींद्र बर्वे, दिनेश अहिरे, कादीर शेख, सोमनाथ ताठे, रंजना अहिरे, बाबू बच्छाव, विलास काकुळते आणि योगेश तेलंग यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले.राज्यातील ८३.७२ लक्ष कुटुंबांना सध्याच्या विमा कंपनीमार्फत रुपये दीड लाखापर्यंत आरोग्य विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्यावरील ५ लाखापर्यंतचे विमा संरक्षण राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत अ‍ॅश्युरन्स तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजेच अंगीकृत रुग्णालयांचे रुपये दीड लाख ते ५ लक्ष मर्यादेपर्यंतचे दावे राज्य आरोग्य हमी सोसायटी अदा करील. कार्यक्रमाला खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जि. प. अध्यक्षा शीतल सांगळे, महापौर रंजना भानसी, आमदार नरेंद्र दराडे, नरहरी झिरवाळ, डॉ. राहुल आहेर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, दीपिका चव्हाण, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, आरोग्य उपसंचालक रत्ना रावखंडे, जिल्हा शल्य चिीकत्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, डॉ. जयराम कोठारी आदी उपस्थित होते.विविध वर्गातील कुटुंबांचा समावेशसन २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमवती व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी ७ वर्गातील कुटुंबाचा तसेच शहरातील कचरावेचक, भिकारी, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर, कारागीर आदी ११ वर्गातील कुटुंबांचा योजनेत समावेश आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGirish Mahajanगिरीश महाजनGovernmentसरकार