म्हाळसाकोरे विद्यालयात व्याख्यानमालेस प्रारंभ
By Admin | Updated: November 21, 2014 23:17 IST2014-11-21T23:16:52+5:302014-11-21T23:17:20+5:30
म्हाळसाकोरे विद्यालयात व्याख्यानमालेस प्रारंभ

म्हाळसाकोरे विद्यालयात व्याख्यानमालेस प्रारंभ
सिन्नर : निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील आरूढ महाविद्यालयात आरूढ व्याख्यानमालेस प्रारंभ करण्यात आला.
वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून व्याख्यानमालेस प्रारंभ झाला. विश्वनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याख्यानमालेत पाटील यांनी ‘वक्तृत्वाची बाराखडी’ या विषयावर विद्यार्थ्यांना वक्तृत्वाचे धडे दिले. कुठल्याही तणावाशिवाय सहज सोप्या शब्दांत विषयाची केलेली मांडणी म्हणजे वक्तृत्व. वक्तृत्वातील गमती जमती सांगून विद्यार्थ्यांना मनोरंजनातून विविध प्रसंगांची माहिती पाटील यांनी दिली. चांगले बोलण्यासाठी चांगले ऐकणेही महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. शब्दातून वक्तृत्व येते. शब्दसंपदा अधिक असण्यासाठी वाचन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. ज्याची शब्दसंपदा अधिक तो चांगले संभाषण करू शकतो. संस्काराप्रमाणे शब्द परिणाम करत असतात. यासाठी केवळ चांगले भाषण ऐकावे असे नाही तर कंटाळवाणे भाषणही ऐकणे आवश्यक आहे. त्यामुळे कसे, किती आणि काय बोलावे हे शिकायला मिळते, असे पाटील यांनी सांगितले.
प्राचार्य बी. के. महाले यांनी प्रास्ताविक केले. एस. पी. सांगळे यांनी सूत्रसंचालन केले. आर. एन. राजोळे यांनी आभार मानले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दौलत मुरकूटे, सरपंच बबन कुटे, उपप्राचार्य आर. जी. खैरे, पर्यवेक्षक डी. ए. उगले आदिंसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)