खावटी योजनेंतर्गत किट वाटपाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:18 IST2021-08-20T04:18:35+5:302021-08-20T04:18:35+5:30

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित ...

Launch of kit distribution under Khawati scheme | खावटी योजनेंतर्गत किट वाटपाचा शुभारंभ

खावटी योजनेंतर्गत किट वाटपाचा शुभारंभ

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील कुटुंबांना कोविड काळामध्ये खावटी अनुदान योजनेंतर्गत आर्थिक मदत व जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार आमच्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा खेलदरी आश्रमशाळेच्या अंतर्गत असलेल्या १७ गावांपैकी खेलदरी गावातील ६२ लाभार्थींना किट वाटप करण्यात आले.

यावेळी भूषण कासलीवाल यांनी कोरोनाकाळात सर्वांनी खूप चांगले सहकार्य केले; परंतु अनेक व्यक्तींना या संकटाला सामोरे जावे लागले. अजूनही कोरोना संपलेला नसल्याने सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमास माजी सरपंच नामदेव माळी, विजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य संजय कडाळे, नितीन फंगाळ तसेच मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो - १९चांदवड खावटी

चांदवड येथे चिंतामणी शिक्षण प्रसारक संस्थेच्या आश्रमशाळेत अनुसूचित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करताना भूषण कासलीवाल. समवेत वर्धमान पांडे, पी. व्ही. मोंढे, सरपंच राहुल जाधव आदींसह लाभार्थी.

190821\19nsk_25_19082021_13.jpg

चांदवड तालुक्यातील चिंतामणी शिक्षण प्रसारक संस्थेच्या आश्रमशाळेत अनूसूचित कुटूंबांना जीवनाश्यक वस्तुंचे कीट वाटप करतांना भूषण कासलीवाल. समवेत वर्धमान पांडे, पी. व्ही. मोंढे, सरपंच राहुल जाधव आदिंसह लाभार्थी

Web Title: Launch of kit distribution under Khawati scheme