काळे प्रतिष्ठानच्या वाचनालयाचा शुभारंभ
By Admin | Updated: December 2, 2015 22:31 IST2015-12-02T22:29:34+5:302015-12-02T22:31:04+5:30
काळे प्रतिष्ठानच्या वाचनालयाचा शुभारंभ

काळे प्रतिष्ठानच्या वाचनालयाचा शुभारंभ
उपनगर : शांतीपार्क येथे बुद्धवासी जयश्रीताई काळे प्रतिष्ठानतर्फे मोफत वाचनालयाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक नानासाहेब गरुड यांच्या हस्ते करण्यात आला. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना पुस्तके, कादंबऱ्या, विविध दैनिके वाचनासाठी शांतीपार्क येथे मोफत वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कामगार नेते प्रकाश पगारे, रामभाऊ काळे, गौरव काळे, अविनाश उघाडे, अजय पगारे, विश्वास काळे, संजय वाणी, सतीश बिऱ्हाडे आदिंसह नागरिक उपस्थित होते.