कादवाच्या गळीत हंगामाचा ३ नोव्हेंबरला शुभारंभ

By Admin | Updated: October 31, 2015 22:47 IST2015-10-31T22:46:23+5:302015-10-31T22:47:48+5:30

कादवाच्या गळीत हंगामाचा ३ नोव्हेंबरला शुभारंभ

The launch of the Kadaw's crushing season on November 3 | कादवाच्या गळीत हंगामाचा ३ नोव्हेंबरला शुभारंभ

कादवाच्या गळीत हंगामाचा ३ नोव्हेंबरला शुभारंभ

 दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचे ३९ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी (दि.३) आमदार नरहरी झिरवाळ यांचे हस्ते सकाळी साडेअकरा वाजता होणार असल्याची माहिती कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली.
कादवाने गळीत हंगामाची पूर्ण तयारी केली असून तीन लाख मे टन गाळपाचे उिद्दष्ठ ठेवण्यात आले आहे. जादा साखर उतारा मिळावा यासाठी परिपक्व झालेल्या उसाची तोडणी करण्याचे नियोजन करण्यात आले असून गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी श्री .व सौ . एकनाथ कचरु बर्डे (ओझे) ,श्री .व सौ .सुधीर केशवराव पाटील (चिंचखेड ),श्री .व सौ. दिलीप त्रंबकराव देशमुख (कोकणगाव बु .),श्री .व सौ .दिलीप त्रंबकराव शिंदे (वलखेड) ,श्री .व सौ. छगनिसंह हरीसिंह परदेशी (वडनेर भैरव) यांचे हस्ते गव्हाण पूजन करण्यात येणार आहे . गळीत हंगाम शुभारंभ सोहळ्यास सर्व सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे ,उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव ,प्र. कार्यकारी संचालक बाळासाहेब उगले व संचालक मंडळाने केले आहे.

Web Title: The launch of the Kadaw's crushing season on November 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.