कामगार कल्याण मंडळाच्या भजन स्पर्धेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:51 AM2019-08-27T00:51:07+5:302019-08-27T00:51:35+5:30

सातपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नाशिक कार्यालयात १५व्या चार दिवसीय राज्यस्तरीय निवासी भजन प्रशिक्षणाला प्रारंभ करण्यात आला.चार ...

 Launch of hymn competition of labor welfare board | कामगार कल्याण मंडळाच्या भजन स्पर्धेला प्रारंभ

कामगार कल्याण मंडळाच्या भजन स्पर्धेला प्रारंभ

Next

सातपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नाशिक कार्यालयात १५व्या चार दिवसीय राज्यस्तरीय निवासी भजन प्रशिक्षणाला प्रारंभ करण्यात आला.चार दिवसीय शिबिरात विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
़़ सातपूर येथील कामगार कल्याण भवन येथे आयोजित भजन प्रशिक्षण शिबिराचे डॉ. रामकृष्ण महाराज लहवीतकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी आदी उपस्थित होते. सहायक कल्याण आयुक्त सयाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली. स्वागत केंद्र संचालक अजय निकम यांनी केले.
सूत्रसंचालन राजेंद्र नांद्रे यांनी केले. शिबिर संचालक नीलेश गाढवे यांनी आभार मानले. यावेळी भास्कर शिरोडे, संतोष सोनवणे, विवेक देशमुख, संदीप पवार, पंकज देशमुख, भरत बोरसे, अशोक क्षीरसागर आदींसह कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरात राज्यातील विविध गटांतील १००च्यावर शिबिरार्थी सहभागी झालेले आहेत. दि.२९ रोजी कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती सहायक कल्याण आयुक्त सयाजी पाटील यांनी दिली.
चार दिवसीय शिबिरात विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले असून, त्यात भजन कीर्तनाचे मूल्य : डॉ. रामकृष्ण महाराज लहवीतकर, भजनात संवादिनीचे कौशल्य : प्रा. आनंद अत्रे, लावूनी मृदुुंग श्रुती टाळ घोष : बाळासाहेब महाराज गतीर, भजन सादरीकरण तंत्र आणि मंत्र : रवींद्र मालुंजकर,तुका म्हणे येथे भजन प्रमाण : माधवदास महाराज राठी, गायनातून अभंगाचे स्वरूप : डॉ.आशिष रानडे, भजनात मृदुंगाचे महत्त्व : नीलेश गाढवे, सांप्रदायिक भजन : शिवराम महाराज बोराडे, भजनाकडून प्रबोधनाकडे : गजेंद्र महाराज रजपूत, भजनाचा उगम : चैतन्य महाराज पैठणकर, भजन आणि भक्ती : रमेश महाराज खाडे, कीर्तनात भजनाचे महत्त्व : शिवा महाराज आडके, भजन आणि ज्ञानविज्ञान : स्वामी कंठानंद, तुकोबांची अभंगवाणी : शिवलिंग स्वामी, भजन आणि सुखप्राप्ती : किशोर महाराज खरात, भजन व भैरवी : पंडित शंकरराव वैरागकर आदींचा समावेश आहे.

Web Title:  Launch of hymn competition of labor welfare board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.