गोदावरी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:21 IST2017-08-20T23:10:26+5:302017-08-21T00:21:14+5:30

मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या नमामि फाउंडेशनतर्फे गोदावरी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या उगमस्थानापासून झाला. हे अभियान उगमस्थानापासून ते हैदराबादपर्यंत चालणार आहे. यावेळी उगमस्थानी गोदामाईची पूजा करण्यात आली.

 Launch of Godavari Sanitation Campaign | गोदावरी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

गोदावरी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

त्र्यंबकेश्वर : मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या नमामि फाउंडेशनतर्फे गोदावरी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या उगमस्थानापासून झाला. हे अभियान उगमस्थानापासून ते हैदराबादपर्यंत चालणार आहे. यावेळी उगमस्थानी गोदामाईची पूजा करण्यात आली. ब्रह्मगिरीवरून खाली उतरून कुशावर्तावर पुनश्च पूजा करण्यात आली. यावेळी गोदावरी स्वच्छता मोहिमेचे राजेश पंडित, अभिनेता चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री धनश्री क्षीरसागर, रोहनकुमार देशपांडे, तहसीलदार महेंद्र पवार, ललिता शिंदे, कैलास देशमुख आदींसह संत जनार्दन स्वामी आश्रमाचे दीपक महाराज उपस्थित होते. त्र्यंबकेश्वरनंतर सर्व मंडळी तळवाडे बेझेमार्गे चक्रतीर्थाकडे रवाना झाले. चक्रतीर्थावर गोदावरी खºया अर्थाने प्रगट होऊन विस्तीर्ण रूपात प्रवाहित झाली आहे. येथून गोदावरी गंगापूरमार्गे नाशिक येथे जाते; मात्र त्र्यंबकेश्वर व परिसरात तुफान पाऊस असल्याने नमामि गोदा फाउंडेशनची ही टीम महिरावणीवरून नाशिककडे रवाना झाली.





 

Web Title:  Launch of Godavari Sanitation Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.