गणेशबाबा पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ

By Admin | Updated: August 12, 2014 01:59 IST2014-08-12T01:57:08+5:302014-08-12T01:59:05+5:30

गणेशबाबा पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ

Launch of Ganesh Baba Poetry Festival | गणेशबाबा पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ

गणेशबाबा पुण्यतिथी सोहळ्यास प्रारंभ

 

नाशिक : नासर्डी पुलाजवळील श्री गणेशबाबानगर येथे श्री संत सद्गुरू सिद्ध दिगंबर गणेश महाराज यांच्या १७ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आजपासून विविध धार्मिक कार्यक्रमांस प्रारंभ झाला आहे. गुरुवारपर्यंत सकाळी दत्तयाग, नाममाहात्म्य सत्संग, दुपारी चैतन्य महाराज यांचे संगीत रामायण, सायंकाळी प. पू. बाबा महाराज तराणेकर यांचे गुरूचरित्र चिंतन यावर प्रवचन होणार आहे. बुधवारी प.पू. नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते पूर्णाहुती व सायंकाळी शंकरराव वैरागर यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवारी सकाळी महापूजा, तीर्थराज पूजन आदि धार्मिक कार्यक्रमांसह दुपारी महाप्रसाद वाटप व सायंकाळी पालखी सोहळा होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Launch of Ganesh Baba Poetry Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.