माणिकपुंजवर एक्स्प्रेस फीडरचा शुभारंभ
By Admin | Updated: July 17, 2014 00:28 IST2014-07-16T23:22:29+5:302014-07-17T00:28:52+5:30
माणिकपुंजवर एक्स्प्रेस फीडरचा शुभारंभ

माणिकपुंजवर एक्स्प्रेस फीडरचा शुभारंभ
नांदगाव : नांदगावला पाणीपुरवठा करणाऱ्या माणिकपुंज धरणाच्या यंत्रणेत चोवीस तास अखंड वीजपुरवठा करणाऱ्या एक्स्प्रेस फीडरचा धरणावर आयोजित कार्यक्रमात नुकताच शुभारंभ करण्यात आला. सदरचे फीडर सुरू होण्याने शहरास होणाऱ्या पाण्याच्या आवर्तनात कपात होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात अडीच कोटी रुपयांच्या पूरक योजनेतून माणिकपुंजचे पाणी नांदगाव शहराला मिळाले, परंतु सदरच्या योजनेसाठीचा वीजपंप ग्रामीण भागात कार्यरत असल्याने येथे सुरू असलेल्या भारनियमनामुळे अवघा आठ तास वीज पुरवठा व्हायचा. एक्स्प्रेस फीडरमुळे चोवीस तास वीजपुरवठा होणार असल्याचे पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे.
एक्स्प्रेस फीडरच्या शुभारंभाप्रसंगी पालिकेचे अभियंता अभिजित इनामदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी योजनेची माहिती दिली. यावेळी आमदार पंकज भुजबळ, बाळकाका कलंत्री, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, अरुण पाटील, नगरसेवक नील सोनवणे, विश्वास अहिरे, भाऊसाहेब काकळीज, विलास राजोळे, सुनील जाधव, भास्कर निकम आदि उपस्थित होते. (वार्ताहर)