दिंडोरी : शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेद्वारे राबविण्यात येणारे रोगनिदान शिबिर लाभदायी ठरत असून, या योजनेचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले.दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आयोजित राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या शुभारंभप्रंसगी आमदार झिरवाळ अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित ९७१ आजारांवर तालुक्यातील एक हजार २४३ गरजू रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. अबालवृद्धांसह महिला रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या शुभारंभप्रसंगी,व्यासपीठावर प्रांताधिकारी मुकेश भोगे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लक्ष्मण लहाडे, दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कोशिरे, विस्तार अधिकारी बच्छाव आदि उपस्थित होते. यावेळी दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक भाऊसाहेब बोरस्ते, कैलास मवाळ, आशा कराटे, संतोष गांगोडे, शैला उफाडे, आशा कराटे, विमल जाधव आदि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
दिंडोरीत जीवनदायी योजनेचा शुभारंभ
By admin | Updated: January 22, 2016 22:55 IST