‘सायकल शेअरिंग’ उपक्रमाचा शुभारंभ
By Admin | Updated: April 9, 2017 00:31 IST2017-04-09T00:31:12+5:302017-04-09T00:31:53+5:30
नाशिक : महापालिका, टीसीएसच्या डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर आणि नाशिक सायकलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सायकल शेअरिंगचे उद्घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आले.

‘सायकल शेअरिंग’ उपक्रमाचा शुभारंभ
नाशिक : शहरातील हवा प्रदूषण, व्यायामासाठी सायकल आणि इच्छित स्थळी जाण्यासाठी सायकलचा वापर वाढावा याकरिता महापालिका, टीसीएसच्या डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर आणि नाशिक सायकलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सायकल शेअरिंग’ या उपक्रमाचे उद्घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आले. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उभारण्यात आलेल्या स्टेशनवर प्रायोगिक तत्त्वावर सदर उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
यावेळी महापौर रंजना भानसी यांनी नाशिक महानगरपालिका असे प्रकल्प राबविण्यासाठी उत्सुक असून, विविध ठिकाणी या उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. चेन्नई विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या संशोधक टीमने ही संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न केला आहे. सायकलचा वापर संपल्यानंतर त्याचठिकाणी सायकल लॉक करून ठेवता येणार आहे. नाममात्र दरात सायकल उपलब्ध असल्याचे टीसीएसच्या डिजिटल इम्पॅक्ट एसक्यूच्या सामाजिक उपक्रमांचे प्रमुख संदीप शिंदे यांनी सांगितले. ‘