शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

देशातील पहिल्या किसान एक्स्प्रेसचा शुभारंभ ; शेतकऱ्यांसाठी रामबाण उपक्रम : नरेंद्रसिंह तोमर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 18:12 IST

शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात थेट बिहारपर्यंत जाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळून त्यांची प्रगती होण्यास मदत होईल. एका अर्थाने किसान पार्सल एक्स्प्रेस शेतकऱ्यांसाठी रामबाण ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले.देशातील पहिल्या किसान पार्सल एक्स्प्रेसला ऑनलाइन हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी तोमर बोलत होते.

ठळक मुद्देकिसान रेल्वेने जोडल्या देशांतर्गत बाजारपेठपहिल्याच दिवशी 50 टन माल रवानादेवळाली ते दानापूर दर शुक्रवारी सेवा

नाशिक :  किसान पार्सल एक्स्प्रेसमुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात थेट बिहारपर्यंत जाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळून त्यांची प्रगती होण्यास मदत होईल. एका अर्थाने किसान पार्सल एक्स्प्रेस शेतकऱ्यांसाठी रामबाण ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले. देशातील पहिल्या किसान पार्सल एक्स्प्रेसला ऑनलाइन हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी तोमर बोलत होते. देवळाली कॅम्प ते दानापूर (बिहार) दरम्यान पहिली किसान एक्स्प्रेस धावणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि इतर नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी किसान एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार देवळाली कॅम्प ते दानापूर दरम्यान देशातील पहिली किसान पार्सल एक्स्प्रेस सुरू करण्यात आली असून, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या एक्स्प्रेसचा शुभारंभ करण्यात आला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, आमदार सरोज आहेर आदी मान्यवर या कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थित होते. याप्रसंगी तोमर म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात देशाचा विकास थांबला असला तरी शेतीक्षेत्र मात्र त्यापासून प्रभावित झाले नाही. शेतकºयांनी त्याची झळ पोहोचू दिली नाही त्यामुळे देशात कोठेही अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार रेल्वे मंत्रालयाने आजपासून किसान पार्सल एक्स्प्रेस सुरू केली असून, ही गाडी शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायी ठरणार आहे. अत्यंत कमी दरात शेतकऱ्याना आपला माल परराज्यांत पाठविता येणार असल्याचे ते म्हणाले. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्हा कृषीसाठी महत्त्वाचा जिल्हा असून, देशातील पहिली रेल्वे नाशिकमधून सुरू होत आहे. नाशिकची निवड ही सार्थ निवड असून, किसान रेल्वेच्या माध्यमातून नाशिकच्या कृषी उत्पादनांना व्यापक बाजार पेठ मिळून या रेल्वेचा सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल.  पहिल्याच गाडीला फुलांच्या माळा लावून सजविण्यात आले होते. कृषिमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर सकाळी ११ वाजून ०५ मिनिटांनी किसान एक्स्प्रेस दानापूरकडे रवाना झाली. पहिल्याच दिवशी नाशिकरोड रेल्वेस्थानकातून तब्बल २२ टन, तर मनमाड रेल्वेस्थानकातून २६.५० टन माल दानापूरकडे रवाना करण्यात आला. देवळाली रेल्वेस्थानकावर आॅनलाइन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमास रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                                                                                 

टॅग्स :railwayरेल्वेNashikनाशिकFarmerशेतकरीBiharबिहार