‘कम्पारमेन्ट बांध’ या कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 05:38 PM2018-12-10T17:38:19+5:302018-12-10T17:39:01+5:30

न्यायडोंगरी : नांदगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत ‘कम्पारमेन्ट बांध’ या कामाचा शुभारंभ न्यायडोंगरी येथील शेतकरी संजय कोºहाळे यांचे शेतात जि. प. सदस्य आर्कि. अश्विनी आहेर यांचे हस्ते करण्यात आला.

Launch of 'Companion Dam' work | ‘कम्पारमेन्ट बांध’ या कामाचा शुभारंभ

‘कम्पारमेन्ट बांध’ या कामाचा शुभारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देनांदगाव : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत ९०.९४ लाखांची तरतूद

न्यायडोंगरी : नांदगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत ‘कम्पारमेन्ट बांध’ या कामाचा शुभारंभ न्यायडोंगरी येथील शेतकरी संजय कोºहाळे यांचे शेतात जि. प. सदस्य आर्कि. अश्विनी आहेर यांचे हस्ते करण्यात आला.
या वेळी प. स. च्या उपसभापती आशा आहेर, सरपंच संजय आहेर, अनेक शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उदघाटन प्रसंगी बोलताना अश्विनी आहेर यांनी जलयुक्त शिवार योजनेचे महत्व पटवून देत शासनाच्या विविध विभागा अंतर्गत या योजनेतून एकट्या न्यायडोंगरी गावासाठी एकूण ३५ कामे मंजूर करण्यात आले असून ते टप्याटप्याने सुरू करण्यात येणार असून त्यात कृषी विभागाच्या वतीने नाला खोलीकरण नऊ, गाळ काढणे चार, कम्पारमेन्ट बांध दोन, लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद कडून सिमेंट नाला बांध दुरुस्तीची चार कामे तर स्थानिक स्थर विभागाच्यावतीने पाच नवीन सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहे, तसेच वन विभागाच्या वतीने तीन, भूजल सर्वेक्षणतर्फे एक व ग्रामपंचायतीच्या वतीने सात असे एकूण पस्तीस कामे जलयुक्त शिवार अभियानाचे सन २०१८/ २०१९ निधीतून ९०.९४ लाख रु पयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
या वेळी तालुका कृषी अधिकारी पवार, तसेच कृषि विभागाचे सिद्दीकी, डोखे, शेवाळे, नाईक, शिंदे यांच्या सह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सोबत फोटो (१० न्यायडोंगरी)

Web Title: Launch of 'Companion Dam' work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी