नाशिक : सोमेश्वर धबधबा येथील व्यंकटेश बालाजी मंदिर येथे ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार (दि.१३) पहाटे महापूजनाने ब्रह्मोत्सवास प्रारंभ करण्यात आला. न्यासाचे विश्वस्त नरेंद्र हरिभाऊ चांदवडकर यांनी सपत्नीक महापूजा केली. महापूजेबरोबरच ध्वजपूजनाचेदेखील यावेळी आयोजन करण्यात आले होते. ध्वजाचे पूजन झाले. या ब्रह्मोत्सवात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
बालाजी मंदिरात ब्रह्मोत्सवास प्रारंभ
By admin | Updated: October 13, 2015 23:09 IST