अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा शुभारंभ
By Admin | Updated: December 4, 2015 21:38 IST2015-12-04T21:36:31+5:302015-12-04T21:38:52+5:30
अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा शुभारंभ

अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा शुभारंभ
त्र्यंबकेश्वर : भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे यांच्या हस्ते तालुक्यातील अंबई येथे करण्यात आला. दोन स्तनदा माता व चार गरोदर स्त्रियांना भाकरी, भात, दाळ, हिरवी भाजी अशा चौकस आहाराचे वाटप करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला. कुपोषणाबाबत उपस्थितांनी मार्गदर्शन करून दिवसातून एकदा चौकस आहार देण्याचे आवाहन केले.
अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण ३३.१ टक्के एवढे आहे. गरोदरपणात शेवटचे तीन महिने व बालक जन्माला आल्यानंतर पहिले तीन महिने पूर्णपणे मातेवर अवलंबून असते. या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे. यावेळी हरसूल व त्र्यंबकेश्वर प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी मोहन तुपे यांनी या योजनेची माहिती दिली. तसेच तालुका आरोग्य (वैद्यकीय) अधिकारी डॉ. योगेश मोेरे, अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डौले, पर्यवेक्षिका सोनवणे, पवार, खोटरे यांनी व्हिडीओ क्लीप दाखवून गरोदरमाता, स्तनदामाता व त्यांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन केले. तर श्रीमती वाटाणे, कुलकर्णी, वाघ आदिंनी गरोदरमाता, स्तनदामाता, बालसंगोपनाबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती गणपतराव वाघ, उपसभापती शांताराम मुळाणे, गटविकास
अधिकारी ज्ञानदा फणसे अंगणवाडी सेविका, मदतनीस, सरपंच, ग्रामसेविका तसेच बचतगटाचे महिला मंडळासह महिला उपस्थित उपस्थित होत्या. सूत्रसंचालन पर्यवेक्षिका कुलकर्णी यांनी केले. (वार्ताहर)