पंचवटीतील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास
By Admin | Updated: April 11, 2016 00:23 IST2016-04-10T23:21:39+5:302016-04-11T00:23:46+5:30
पंचवटीतील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

पंचवटीतील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास
नाशिक : पंचवटीतील कालिकानगरमधील एका बंद बंगल्याच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी बंगल्यातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेल्याची प्रकार शनिवारी (दि़९) सकाळी उघडकीस आला आहे़
रासबिहारी मेरी लिंकरोडवरील गोदावरी रो-बंगलोतील रहिवासी गिरीश मकडू चित्ते हे ५ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत बाहेरगावी गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी बंगल्याच्या हॉलमधील खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश केला़ यानंतर घरातील लोखंडी कपाटातील दहा ग्रॅम सोन्याचे दागिने, एक टॅबलेट व रोख रुपये असा एकूण ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़
या प्रकरणी चित्ते यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)