उशिरा आलेले मतदार आल्यापावली परत
By Admin | Updated: February 22, 2017 01:19 IST2017-02-22T01:19:02+5:302017-02-22T01:19:17+5:30
उशिरा आलेले मतदार आल्यापावली परत

उशिरा आलेले मतदार आल्यापावली परत
उपनगर : प्रभाग १६ मधील अ- अनुसूचित जाती-७, ब- अनुसूचित जमाती- १०, क- नागरिकांचा मागासवर्ग- ७, ड- सर्वसाधारण खुल्या गटातील- ८ उमेदवार असे एकूण ३२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, मतदारांनी कुणाच्या बाजुने कौल दिला हे गुरुवारी २३ तारखेला स्पष्ट होणार आहे. प्रभाग १६ मधील मतदारांसाठी मनपा शाळा क्र. १७, ६३, ५०, ३८, ४६, ४७ याचबरोबर जनता विद्यालय, महाराष्ट्र हायस्कूल, गोल्डन होरायझन स्कूल, गांधीनगर मुद्रणालय वेल्फेअर हॉल, रामदास स्वामीनगर समाजमंदिर आदि ठिकाणी सुमारे ४० बूथवर ३० हजार ९४८ मतदारांसाठी मतदानाची सोय करण्यात आली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत ३८ टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदारांचा ओघ वाढल्यानंतर टक्केवारी साडेपाच वाजेपर्यंत ५५ टक्केपर्यंत पोहचली. मात्र मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदार मोठ्या संख्येने रांगा लावून उभे होते. साडेपाच वाजता पोलीस प्रशासनाने मतदान केंद्राच्या आवारात उभ्या असणाऱ्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देत मतदान केंद्राचे प्रवेशद्वार बंद केली. उशिरा मतदान केंद्रावर पोहचणाऱ्या अनेक मतदारांना त्यामुळे आल्यापावली परतावे लागले. (वार्ताहर)