तळवाडेच्या सरपंचपदी लता सांगळे बिनविरोध
By Admin | Updated: October 21, 2016 23:51 IST2016-10-21T23:51:07+5:302016-10-21T23:51:54+5:30
तळवाडेच्या सरपंचपदी लता सांगळे बिनविरोध

तळवाडेच्या सरपंचपदी लता सांगळे बिनविरोध
सायखेडा : तळवाडे (ता. निफाड) च्या सरपंचपदी लता सांगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. येथील आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गातील असल्याने सरपंचपदासाठी एकमेव लता सांगळे यांचा अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कारवाल यांनी सांगळे यांची बिनविरोध निवड केली. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी केदारे, ग्रामसेवक अविनाश घाटेकर, उपसरपंच
रामदास सांगळे, शरद सांगळे, शिवाजी नागरे, सविता सांगळे, मंगला गायकवाड, अनिता साळवे, अर्जुन सांगळे, सोमनाथ सांगळे, शंकर सांगळे, मधुसूदन सांगळे, राजेंद्र सांगळे, जयराम सांगळे, संदीप सांगळे, विठ्ठल सांगळे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.