शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Lata Mangeshkar: स्वरगंगा दक्षिणगंगेत विलीन! भावपूर्ण वातावरणात लता मंगेशकर यांच्या अस्थींचे विसर्जन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 11:18 IST

Lata Mangeshkar: लतादीदींचे बंधू पं. हृदयनाथ यांचे पुत्र आदिनाथ, उषा मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने विधीवत कलशपूजन करून भावपूर्ण वातावरणात अस्थिविसर्जन करण्यात आले. 

नाशिक  : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अस्थींचे विसर्जन गुरुवारी ( दि. 10) सकाळी रामकुंडानजीकच्या अस्थीविलय कुंडात करण्यात आले. लतादीदींचे बंधू पं. हृदयनाथ यांचे पुत्र आदिनाथ, उषा मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने विधीवत कलशपूजन करून भावपूर्ण वातावरणात अस्थिविसर्जन करण्यात आले.

लतादीदी यांच्या पार्थिवावर रविवारी (दि. 6 ) सायंकाळी दादरमधील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मंगेशकर कुटुंबीय सकाळी विशेष विमानाने मुंबईहून ओझर येथे आणि तिथून कारने  सव्वा दहा वाजता नाशिकला दाखल झाले. महापालिकेच्यावतीने रामकुंडावर शामियाना उभारून पूजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर रामकुंडावर शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत कलशपूजन करून मंत्रोच्चारासह सर्व विधी पार पाडून सकाळी 11 वाजून 10  मिनिटांनी अस्थींचे विसर्जन करण्यात आले.

लतादीदींचे भाचे आदिनाथ यांनीच सर्व विधी पार पाडले. यावेळी त्यांच्यासमवेत लतादीदींच्या भगिनी उषाताई मंगेशकर, बैजनाथ, राधा,  कृष्णा आदिनाथ  मंगेशकर. मयुरेश  पै, मीनाताई यांचे पती योगेश खर्डीकर यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मंगेशकर घराण्याचे उपाध्ये वेदमूर्ती शांतारामशास्त्री भानोसे आणि गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली कलशपूजनासह सर्व धार्मिक विधी करण्यात आले. जिल्हाधिकारी सुरज मांढरे महापालिका आयुक्त कैलास जाधव, मंगेशकर कुटुंबियांचे निकटवर्तीय प्रशांत जुन्नरे,  माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.अस्थी विसर्जनासाठी नाशिककर रसिकांनी रामकुंडाच्या दुतर्फा दर्शनासाठी गर्दी केली होती.

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरgodavariगोदावरीNashikनाशिक