..अखेर पाणीपुरवठा सुरळीत
By Admin | Updated: July 3, 2017 00:17 IST2017-07-03T00:17:16+5:302017-07-03T00:17:28+5:30
नायगाव : पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे वृत्त प्रसिध्द करताच जलवाहिनीची दुरु स्ती करु न पाणी पुरवठा सुरळीत केल्या.

..अखेर पाणीपुरवठा सुरळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नायगाव : दोन महिन्यांपासून जीवन प्राधिकरणाच्या नळपाणी पुरवठा योजनेद्वारे होणारा पाणी पुरवठा जलवाहिनी दुरवस्थेच्या कारणामुळे देशवंडीकरांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द करताच संबंधित विभागाने जलवाहिनीची दुरु स्ती करु न पाणी पुरवठा सुरळीत केल्याने देशवंडीकरानी समाधान व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनी नादुरुस्त असल्याच्या कारणामुळे देशवंडीकरांचा पाणी पुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा ठप्प झाल्याने तीव्र टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी संबंधित विभागात अनेकवेळा तक्रारी करुनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली होती. गावात पाण्याची दुसरी व्यवस्था नसल्यामुळे पाणी टंचाईने हैराण झालेल्या ग्रामस्थांनी संबंधित विभागाच्या आधिकाऱ्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच शुक्रवारी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या जलवाहिणीची दिवसभरात दुरुस्ती करुन देशवडीचा पाणी पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे शनिवारी देशवंडीकराना दोन महिन्यांच्या खंडानंतर पुरेसे पाणी मिळाले. सिन्नर तालुक्यात अनेक गावांमध्ये अशा प्रकारची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारींची जर दखल घेतली तर पाणीप्रश्न सुटू शकतो, असे मत यानिमित्त व्यक्त होत आहे.